Latest

कारवारमधून गोव्याला बेडकांची तस्करी; जंपिंग चिकन थाळीसाठी मागणी, दोघांना अटक

मोहन कारंडे

कारवार; पुढारी वृत्तसेवा : जंपिंग चिकन या प्रसिद्ध थाळीसाठी आवश्यक असलेल्या बेडकांची तस्करी कारवारमधून गोव्याकडे होत असल्याचे उघडकीस आले असून, ४३ बेडूक जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. वनखात्याच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी (दि. १८) येथील काळी नदीजवळ ही कारवाई केली.

एका खासगी बसमधून कारवारहून गोव्याकडे बेडकांची तस्करी होत होती. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी बसची झडती घेतली असता बेडकांची तस्करी होत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी खासगी बसचा मालक व चालक सिद्धेश आणि वाहक जानू यांना अटक करण्यात आली आहे. बसच्या डिक्कीत ४३ बेडूक पोत्यात बांधून ठेवण्यात आले होते.

कारवार येथे नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे कारवार परिसरात कृषी आणि पाणथळ जागांमध्ये बेडूक मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनाधिकारी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT