Latest

KK Goswami : ‘शक्तिमान’ फेम अभिनेत्याच्या कारला लागली आग, मुलगा सुखरूप

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'शक्तिमान' आणि 'गुटर गू' या मालिकेतील अभिनेता केके गोस्वामी ( KK Goswami ) यांच्या कारला आग लागली आहे. या अपघातावेळी त्याचा मुलगा नवदीप कार चालवत होता. नवदीपने प्रसंगावधान राखत कारमधून उतरल्याने सुदैवाने तो बचावला आहे.

मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, केके गोस्वामी ( KK Goswami ) यांचा २१ वर्षीय मुलगा नवदीप त्यांच्या कारमधून कॉलेजला जात होता. याचदरम्यान अचानक रस्त्यात कारला आग लागली. घटनेचे गांभीर्य ओळखून नवदीपने कार थांबवली आणि तो रस्त्याच्या बाजूला गेला. यामुळे तो सुदैवाने बचावला आहे. या अपघातात कोणाचीही हानी झाली नाही. तर कारचे नुकसान झाले आहे.

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. कारला आग कशी लागली? याचा तपास पोलीस करत आहेत. केके गोस्वामी यांच्या कारला आगल्याची माहिती सोशल मीडियावरून मिळताच चाहत्यांना धक्का बसला आहे.

केके गोस्वामी यांचे पूर्ण नाव कृष्णकांत गोस्वामी असून ते बिहारचे रहिवासी आहेत. केके गोस्वामी यांची उंची ३ फूट असल्याने मुंबईत आल्यावर अभिनयासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. केके गोस्वामी यांनी अनेक टीव्ही मालिकेसोबत हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती आणि भोजपुरी चित्रपटात अभिनयाचा ठसा उमठवला. गोस्वामी यांनी आपल्या अभिनयामुळे इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT