Latest

Skoda Octavia : स्कोडाचा ग्राहकांना धक्का! ऑक्टाव्हिया मॉडेल कायमचे बंद

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्कोडा कंपनी (Skoda Auto India) ही भारतातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीच्या काही कार मॉडेलचे चाहते मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. विशेष म्हणजे ऑक्टाव्हिया या कारचा चाहतावर्ग खूप आहे. कारच्या लुकमुळे याची क्रेझ अनेक ऑटोमोबाईल चाहत्यांमध्ये आहे. पण आता या सर्व चाहत्यांकरिता एक निराशाजनक बातमी आहे, ती म्हणजे स्कोडा कंपनीने त्यांचे प्रसिद्ध ऑक्टाव्हिया हे सेडान कार मॉडेल हे बंद केले आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता या जुन्या कार मॉडेलला राम राम करावा लागणार आहे. (Skoda Octavia)

गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक कंपन्यांनी त्यांचे काही मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणाऱ्या कंपन्यांपैकी काही दिग्गज कंपन्या देखील आहेत. यापैकी स्कोडा ऑटो इंडिया ही एक कंपनी आहे. या कंपनीने ऑक्टाव्हिया या आपल्या प्रसिद्ध कारचे उत्पादन बंद केले. हिंदूस्थान टाईम्स या माध्यमाने याबाबतची माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरुन या सेडान कार मॉडेलचे नाव काढून टाकले आहे. (Skoda Octavia)

स्कोडाने ऑक्टाव्हिया बंद करण्याची कारणे काय?

१ एप्रिल २०२३ पासून भारतात वाहनाशी संबंधित नवीन उत्सर्जन नियम (RDE Phase-2) लागू करण्यात आले. त्यानुसार Skoda Auto India कंपनी BS6 वाहनांमधील फेज-2 उत्सर्जन नियमांनुसार बदल करत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, देशातील स्कोडा ऑक्टाव्हिया बंद करण्याचा निर्णय सेडानची कमी मागणी आणि नवीन उत्सर्जन मानदंडांच्या अंमलबजावणीमुळे घेण्यात आला आहे. कारचाहत्यांना निराशा देणाऱ्या या माहितीमुळे बंद मॉडेल कारच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. नवीन जनरेशनमधील स्कोडा ऑक्टाव्हिया ही 2021 मध्ये भारतात लॉन्च करण्यात आली होती.

स्कोडा ऑटो इंडिया या ऑटोमोबाईल कंपनीकडे आता Kushaq Monte Carlo, Slavia, Kushaq, Superb आणि Kodiaq इतक्याच मॉडेल्स शिल्लक आहेत. नव्या पिढीतील स्कोडा ऑक्टाव्हियाची स्पर्धा एंट्री लेव्हलच्या लक्झरी कार्सशी होती. मात्र, त्याची किंमत खूप जास्त असल्याने फारच कमी लोक ही कार विकत घेत होते. त्यामुळे मर्यादित ग्राहकांमुळे, कंपनीने नवीन नियमांनुसार यामध्ये करण्याचा निर्णय घेतला नाही, यामुळे हे मॉडेल बंद झाले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT