Latest

युक्रेनमधील सुमीमध्ये अडकलेले ६०० विद्यार्थी मायदेशी परतले

backup backup

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : युध्दग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या सहाशे विद्यार्थ्यांना पोलंडमार्गे भारतात आणण्यात आले आहे. पोलंडमधील रझेझोव्ह येथून एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले होते. शुक्रवारी सकाळी हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. युक्रेनमधील सुमी येथे हे विद्यार्थी अडकले होते व त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारला विशेष मेहनत घ्यावी लागली होती

विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने पोलंडला तीन विमाने पाठविली होती. एकापाठोपाठ तिन्ही विमाने भारतात परतली. युक्रेन मध्ये अडकलेले विद्यार्थी व भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी सरकारने 'ऑपरेशन गंगा' मोहीम राबविलेली आहे. मोहिमेअंतर्गत आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT