Latest

Sunil Babu : ‘सीता रामम’चे आर्ट दिग्दर्शक सुनील बाबू यांचे हृदयविकाराने निधन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सीता रामम'चे दिग्दर्शक सुनील बाबू ( Sunil Babu) याचं हृदयविकाराचा झटकाने निधन झाले आहे. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आर्ट दिग्दर्शिक सुनील बाबू यांच्या निधनाची माहिती फिल्ममेकर अंजली मेनन यांनी सोशल मीडियावर दिली. यानंतर संपुर्ण बॉलिवूड इंडस्ट़्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काही दिवसांपासून सुनील बाबू ( Sunil Babu) यांच्या पायाला सूज येत असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

सुनील बाबू यांनी 'सिंह इज किंग', 'एमएस धोनी', 'पा', 'लक्ष्य', 'स्पेशल २६' यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. त्यांनी मल्याळम, तेलगू, तमिळ, हिंदीसोबत कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर म्हणूनही काम केले आहे. सुनील यांनी साऊथ आणि बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही काम केलं आहे. त्यानीं हॉलिवूडमधील 'रोज' चित्रपटातून पहिल्यांदा पदापर्ण केले. त्याना पुरस्कारदेखील मिळाले आहेत.

सुनील बाबू यांच्या निधनाची माहिती अंजली मेनन, दुलकर सलमान यांनी सोशल मीडियावर दिली आहे. यानंतर अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT