पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध इंडियन आयडॉल (Indian Idol 1 ) हा छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. या शोचा पहिला सीझन २००४ मध्ये पार पडला असून अंतिम फेरीत गायक अभिजीत सावंत विजेता ठरला. तर उपविजेता अमित साना हा ठरला. मात्र, गेल्या दोन दिवसांपूर्वी अमितने माझी वोटींग लाईन बंद केल्याने अभिजीतला विजेतेपद मिळाल्याचा आरोप केला होता. यामुळे १९ वर्षापूर्वीची घडलेल्या घटनेचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. आता अमितच्या या आरोपावर अभिजीतने मौन सोडलं आहे.
संबंधित बातम्या
अभिजीतने नुकतेच एका मुलाखतीत अमितने केलेल्या आरोपावर मौन सोडले आहे. यात त्याने म्हटलं की, 'अमित साना खूपच भोळा आणि साधा आहे. त्यावेळी इंडियन आयडॉल शोचं आंतरराष्ट्रीय स्तरावरून निरीक्षण केलं जात होतं. तर दुसरीकडे देशभरातील लोक स्पर्धेच्यावेळी दोघांना मते देत होती. एका स्पर्धकाला मते मिळतात आणि दुसऱ्या स्पर्धकाला मते मिळत नाही, असे कसे होऊ शकते. यापूर्वी मी अनेक शोमध्ये भाग घेतला आहे. कोणत्याही स्पर्धेत हरण्याची अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. आता १९ वर्षानंतर ही घटना समोर आणून काय उपयोग आहे. यांचा अर्थ काय समजावा.'
दोन दिवसापूर्वी अमितने सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत माझी वोटिंग लाईन बंद केल्याचे स्वत: या शोत हरल्याची माहिती दिली होती. याशिवाय मी हारल्याने गायक अभिजीत सावंत विजेता घोषित झाल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर अभिजीतने सडेतोड उत्तर दिलं आहे. (Indian Idol 1 )
इंडियन आयडॉल १ चा ग्रँड फिनाले ५ मार्च २००५ रोजी प्रसारित झाला होता. फराह खान आणि सोनू निगमने यांनी जजची खुर्ची सांभाळली होती. अभिजीत सावंत आणि अमित सनासोबत राहुल वैद्य आणि प्राजक्ता शुक्रे हे या सीझनचे फायनलिस्ट होते.