पुणे : पुढारी वृत्तसेवा : सराफा बाजारात सोन्याची झळाळी कमी झाली असून, मागील काही दिवसांत सोन्यासह चांदीच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या आठ दिवसांत सोन्याच्या भावात तोळ्यामागे 2 हजार रुपये, तर चांदी किलोमागे 2 हजार रुपयांनी उतरली आहे. सोन्याचे दर 58 हजार 500 रुपये प्रतितोळा, तर चांदीचे दर 70 हजार रुपयांवर स्थिरावले आहेत.
देवकर ज्वेलर्सचे दत्तात्रय देवकर म्हणाले, 'फेब्रुवारी महिन्यापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ झाली होती. परिणामी, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी पातळीवर पोहचले होते. मात्र, सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने व चांदीच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी, सराफा बाजारांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवाती पासूनच सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. सध्या सोन्या-चांदीला मिळत असलेले दर हे मागील 2 महिन्यांतील नीचांकी आहेत.'
हे ही वाचा :