Latest

Sikkim Snowfall : मोठी बातमी! सिक्किममध्ये प्रचंड बर्फवृष्टी; 900 पर्यटक अडकले…

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sikkim Snowfall : सिक्किममध्ये प्रचंड बर्फवृष्टीमुळे सुमारे 900 पर्यटक मार्गात अडकले आहेत. हे सर्वजण नाथू ला आणि त्सोमगो तलावातून शनिवारी संध्याकाळी ८९ वाहनांतून गंगटोकला परतत होते. लष्करासह पोलिसांनी बचावकार्य सुरू केले आहे. पूर्व सिक्कीममध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी नाथु ला आणि त्सोमगो तलावासाठी पास देणे बंद केले होते.

Sikkim Snowfall : पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत 15 वाहने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली आहेत. गंगटोकपासून ४२ किमी अंतरावर पर्यटक अडकून पडले आहेत. हळूहळू बर्फ हटवला जात असून पर्यटकांना बाहेर काढले जात आहे. काही पर्यटकांना जवळपासच्या लष्करी छावण्यांमध्ये सामावून घेतले जाऊ शकते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT