Latest

WTC final : पंचांच्‍या निर्णयावर टीका : ‘आयसीसी’ने ठोठावला शुभमन गिलला दंड!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्‍यात पराभवाला सामाेरे जावे लागलेल्‍या टीम इंडियाला आणखी एक धक्‍का बसला आहे. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) शुभमन गिलला त्याच्या मॅच फीच्या ११५ टक्‍के दंड ठोठावला आहे. पंचांच्‍या निर्णयावर टीका केल्याबद्दल त्‍याला हा दंड ठोठावण्‍यात आला आहे. (  WTC final Shubman Gill ) तसेच स्लो ओव्हर रेटसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाला दंड ठोठावण्यात आला असल्‍याची माहिती 'आयसीसी'ने दिली आहे.

WTC final Shubman Gill : अंतिम सामन्‍यात नेमकं काय घडलं हाेतं ?

शुभमन गिलने स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कॅमेरून ग्रीनच्या हाती झेल दिला. कॅमेरूनने डाव्या हाताने जवळजवळ जमिनीला स्पर्श करून कॅच उचलून सर्वांना आश्चर्यचकित केले. हा निर्णय थर्ड अंपायरकडे गेला, अंपायरला निर्णय घ्यायला बराच वेळ लागला. पण जेव्हा गिलला आऊट करण्यात आले. समालोचन करताना दीप दासगुप्ता आणि हरभजन सिंगही शुभमन नाबाद असल्याचे म्हटले हाेते. पंचांच्‍या निर्णयावर चाहतेही खूप संतापलेले दिसले. भारताचा माजी क्रिकेटर सेहवागनेही ट्विट केले हाेते की, "जेव्हा थर्ड अंपायर पुराव्याच्या आधारे निष्कर्षापर्यंत पोहोचू शकला नाही, तेव्हा तो नॉट आउट होता," . पंचाच्‍या निर्णयावर टीका केल्‍यामुळे शुभमन गिलला त्याच्या मॅच फीच्या ११५ टक्‍के दंड ठोठावला असल्‍याचे 'आयसीसी'ने स्‍पष्‍ट केले आहे.

स्लो ओव्हर रेटसाठी भारतीय संघाला 100 टक्के आणि ऑस्ट्रेलियाला 80 टक्के दंड

अंतिम सामन्यादरम्यान, दोन्ही संघांनी बहुतेक षटके त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी केली. त्यामुळे या सामन्यात कोणत्याही दिवशी पूर्ण ९० षटके खेळता आली नाहीत. या सामन्यानंतर आयसीसीने दोन्ही संघांवर कारवाई केली आहे. भारतीय खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के तर ऑस्ट्रेलियाला 80 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतीय संघ वेळापत्रकानुसार पाच षटके मागे होता, तर ऑस्ट्रेलियन संघ चार षटके मागे होता. खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.22 नुसार, संघ निर्धारित वेळेत षटके पूर्ण करू शकला नाही तर खेळाडूंना टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारला जातो. पाच षटके मागे राहिल्याने भारतीय संघाची संपूर्ण मॅच फी कापण्यात आली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला मॅच फीच्या ८० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT