पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल याने आपल्या नावावर नवा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करताना त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा विक्रम मोडत काढला असून, ताे वन-डे क्रिकेटमधील नंबर वन खेळाडू ठरला आहे. ( Shubman Gill ODI Record )
शुभमन गिलने शनिवारी (दि.२९) वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३४ धावा केल्या. या सामन्यात १७ व्या षटकात तो गुडाकेश मोतीचा बळी ठरला. त्याने 49 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 34 धावांची खेळी केली. त्याने इशान किशन (55) सोबत पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. त्याचे अर्धशतक हुकले. मात्र या खेळीमुळे त्याच्यावर नावावर नवा विक्रम नोंदला गेला आहे.
भारताचा स्टार क्रिकेटर गिल वन-डे क्रिकेटमध्ये २६ डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. जानेवारी २०१९ मध्ये त्याने वन-डेमध्ये पदार्पण केले. शनिवारी त्याने आपल्या वन-डे क्रिकेट कारकिर्दीतील २६ वा सामना खेळला. त्याने 26 वन-डे सामन्यात १३५२धावा केल्या आहेत. तर बाबरने २६ डावात १३२२ धावा केल्या. इंग्लंडचा माजी क्रिकेटर जोनाथन ट्रॉट याने २६ सामन्यांमध्ये १३०३ धावा गेल्या आहे. गिलची सध्या सरासरी ६१.४५ आहे. त्याने वन-डे फॉर्मेटमध्ये एकूण चार शतके आणि पाच अर्धशतके केली आहेत. २६ डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता शुभमन गिलच्या नावावर नोंदला गेला आहे. या कामगिरीमुळे २६ डावांमध्ये सर्वाधिक धावा असणार्या पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मोडित निघाला आहे.