Latest

चिकोडी येथे दुकानाला आग, १० लाखांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक

backup backup

चिकोडी; पुढारी वृत्तसेवा : शॉर्ट सर्किटने स्टेशनरी दुकानाला, घराला आग लागण्याची घटना चिकोडी शहरात रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. मध्यरात्रीपर्यंत आग विझविण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करीत होते. या दुर्घटनेत १० लाख रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आहे.

चिकोडी शहरातील कृष्णा चौकापासून नजीक एसबीआय बँकेच्या समोर अमित शिवानंद मुसंडी यांचे महाकोटेश्वरी स्टेशनरी दुकान असून त्याच्यामागेच त्यांचे घरदेखील आहे.

शहरात मुसळधार पाऊस झाल्याने लवकरच दुकान बंद करून ते गेले होते. रात्री १०.३० च्या सुमारास दुकानात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. बघता संपूर्ण दुकानाला आगीने पेट घेतला. यात ५ झेरॉक्स मशीन, १लॅपटॉप, १ एसी, १ कॅमेरा, १ एलईडी टीव्ही, वह्या, पुस्तके व इतर स्टेशनरी साहित्य असे एकूण १० लाख रुपयांचे साहित्य जळून गेले.

आग लागल्याची माहिती दुकानाच्या मागे असलेल्या घरातील लोकांना कळल्यानंतर सर्वजण मागच्या दरवाजाने बाहेर निघाले. घरालादेखील आग लागण्याची शक्यता असल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब येऊन पाण्याचा फवारा केला.

SCROLL FOR NEXT