Latest

Shootout in America : अमेरिकेत शाळेत गोळीबार, तीन मुलांसह 6 ठार; हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे मोठे वक्तव्य म्हणाले,

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Shootout in America : अमेरिकेच्या नैशविले येथे एका प्राथमिक विद्यालयात सोमवारी एका महिला हल्लेखोराने गोळीबार केला. या गोळीबारात 3 मुलांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर महिलेला ठार केले. मात्र, हल्ल्याचा उद्देश अजून उघड झाला नाही.

याबाबत नैशविले पोलिसांनी माहिती दिली की, त्यांना सोमवारी सकाळी 10 च्या दरम्यान एक इमरजन्सी कॉल आला. यामध्ये एक महिला हल्लेखोर शाळेत घुसून गोळीबार करत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर 15 मिनिटांत ते घटनास्थली दाखल झाले. त्यांनी महिला हल्लेखोराला ठार केले.

तत्पूर्वी महिलेने केलेल्या गोळीबारात तीन लहान मुलांसह 6 जणांचा मृत्यू झाला. ज्या शाळेत हल्ला झाला ती एक पूर्व प्राथमिक शाळा आहे. या शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी 12 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

दरम्यान, महिलेचा गोळीबाराचा उद्देश समोर आलेला नाही. हल्लेखोर महिला ही 28 वर्षांची होती. या महिलेने शाळेत का हल्ला केला याचा शोध पोलिस घेत आहेत.

Shootout in America : घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे मोठे वक्तव्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सोमवारी (स्थानिक वेळेनुसार) नॅशव्हिल येथील शाळेत झालेल्या गोळीबाराला "Sick" म्हणून संबोधले आणि म्हटले की अमेरिकेला बंदूक हिंसाचाराबद्दल ठोस पावले उचलावी लागतील कारण "हे या देशाच्या आत्म्याला फाडून टाकत आहे."

नॅशव्हिलमधील कॉनव्हेंट स्कूलमध्ये एका व्यक्तीने तीन मुलांसह सहा जणांची हत्या केल्यानंतर बायडेन यांनी ही टिप्पणी केली आहे. तसेच त्यांनी कॉंग्रेसला प्राणघातक शस्त्रांवर बंदी घालण्याचे आवाहन केले आणि सांगितले की नॅशव्हिलमधील शूटरकडे दोन प्राणघातक शस्त्रे आणि एक पिस्तूल असल्याची माहिती आली आहे. त्यामुळे प्राणघातक शस्त्रांवर बंदी घालण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

Shootout in America : यापूर्वीही घडल्या आहेत गोळीबाराच्या अनेक घटना

अमेरिकेत गोळीबाराची घटना नवीन नाही. यापूर्वी देखील गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, अलिकडील काळात गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. रविवारी कॅलिफोर्नियातील एका गुरुद्वारामध्ये दोन लोकांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका व्यक्तीने दुस-या एका व्यक्तीच्या मित्रावर गोळ्या घातल्या. त्यानंतर झालेल्या लढाईत दुस-या एका व्यक्तीने आपल्या मित्राला गोळी घालणा-या हल्लेखोरावर गोळ्या झाडल्या आणि तो फरार झाला.

दरम्यान या दोन्ही जखमी लोकांना रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर पोलिसांनी साडेतीनच्या सुमारास दोन व्यक्तींना याप्रकरणी अटक केली. मात्र, गोळीबारात हे दोघेच होते हे स्पष्ट होते.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT