Latest

अमेरिकेत ‘एलजीबीटीक्‍यू’ नाईट क्‍लबमध्‍ये अंदाधूंद गोळीबार, पाच ठार, १८ जखमी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेमध्‍ये गोळीबाराच्‍या घटनांचे सत्र सुरुच राहिले आहे. कोलोराडो स्‍प्रिंग्‍समध्‍ये शनिवारी रात्री (भारतीय प्रमाण वेळेनुसार आज दि. २० ) एका 'एलजीबीटीक्‍यू' नाईट क्‍लबमध्‍ये अंदाधूंद गोळीबाराची घटना घडली. यामध्‍ये पाच जण ठार झाले असून, १८ जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती स्‍थानिक पोलिसांनी दिली आहे.

स्‍थानिक पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११ वाजून ५७ मिनिटांनी 'एलजीबीटीक्‍यू' नाईट क्‍लबमध्‍ये अंदाधूंद गोळीबार झाल्‍याची माहिती मिळघली. पोलिसांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेतली. येथे एका संशयित आरोपीला ताब्‍यात घेतले. या घटनेत गोळीबार करणारा संशयितही जखमी झाला आहे.

या घटनेबाबत एलजीबीटीक्‍यू' नाईट क्‍लबने आपल्‍या फेसबुक पेजवरुन या घटनेला दुजोरा दिला. तसेच या हल्‍ल्‍याचा तीव्र शब्‍दांमध्‍ये निषेध केला आहे. अमेरिकेत सामूहिक गोळीबार आणि हत्‍यांकाडाच्‍या घटनांमध्‍ये अलिकडे वाढ झाली आहे. या घटनांची माहिती घेण्‍यास द गन व्‍हायलंस आर्कोव्‍हएच्‍या माहितीनुसार या वर्षी जुलै महिन्‍यापर्यंत अमेरिकेत ३०९ गोळीबाराच्‍या घटना घडल्‍या आहेत. विविध ठिकाणी झालेल्‍या गोळीबारात ११ वर्षांपर्यंतची १७९ मुले, १२ ते १७ वर्षांचे ६७० किशोरवयीन मुलांचा मृत्‍यू झाला आहे. २०२१ मध्‍ये अमेरिकेत ६९३ गोळीबाराच्‍या घटना घडल्‍या होत्‍या. तर २०१९मध्‍ये हा आकडा ४१७ इतका होता.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT