Latest

पुणे : शिरसाई कालव्याची जलवाहिनी पुन्हा फुटली; लाखो लीटर पाणी वाया

अमृता चौगुले

उंडवडी : पुढारी वृत्तसेवा

शिर्सुफळ येथील शिरसाई कालव्याची जलवाहिनी मंगळवारी (दि. १९) पुन्हा फुटली. यामध्ये लाखो लीटर पाणी वाया गेले. याला जबाबदार कोण सा सवाल येथील नागरीक करत आहेत. एका वर्षात दुसऱ्यांदा ही जलवाहिनी फुटली. दोनदा लाखो लिटर पाणी वाया गेले.

या जलवाहिनीतून साबळेवाडी ,गाडीखेल, कारखेल, भगतवाडी या गावांमध्ये पाणी चालू होते. त्यासाठी पाच पंप सुरू होते. मागील ८ महिन्यांपूर्वी म्हेत्रे वस्ती येथे ही जलवाहिनी फुटली होती आणि शेकडो लोकांच्या घरामध्ये पाणी घूसले होते तसेच लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. प्रशासनाने पंचनामे करून देखील अद्याप तेथील लोकांना भरपाई मिळाली नाही.

दरम्यान, मंगळवारी पंप हाऊसजवळ जलवाहिनी फुटली. त्यावेळी मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले. या घटनेला जवाबदार कोण असा सवाल येथील नागरिकांनी केला. पंप हाऊस येथील ऑपरेटर झगडे यांनी हा आवाज ऐकून सुरू असलेले पाच पंप बंद केले. भर उन्हाळ्यात जलवाहिनी फुटल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही जलवाहिनी फुटण्यामागची कारणे शोधुन त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

वीजेचा दाब वाढल्याने फुटली जलवाहिनी

दरम्यान जलवाहिनी फुटल्याची घटना समजल्यानंतर देखील घटनास्थळी एकही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि परत पूर्ववत झाल्याने झटका बसून ही जलवाहिनी फुटल्याचे संबंधित अधिकारी यांनी सांगितले.

https://youtu.be/mAvtc7en8CE

SCROLL FOR NEXT