पुढारी ऑनलाईन डेस्क : बीकेसी मैदानावर गुरुवारी (दि. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) सभा पार पडली. या सभेला प्रचंड गर्दी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) या दोन्ही नेत्यांची भाषणे यावेळी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना त्यांनी दावोस मधील एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकला आणि मोदींना हसू आवरेना असे काहीसे चित्र या सभेत पहायला मिळाले. त्यामुळे शिंदे असं काय म्हणाले ज्यामुळे मोदींनाही हसु आलं, याची चर्चा सध्या जोरदार आहे. ( BKC Speech Eknath Shinde)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना त्यांनी राजकीय घडामोडींवर मत व्यक्त केले. याच दरम्यान त्यांनी दावोस भेटीमधील काही महत्त्वाच्या घडामोडी सांगितल्या. यावेळी त्यांनी तेथील नेत्यांशी साधलेला संवाद सांगितला. हा संवाद सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष होते. सध्याच्या राजकीय घडामोडींवर देखील ते बोलत होते आणि याच दरम्यान त्यांनी दावोसमधील लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या हे सांगितले. हे ऐकत असताना मोदींचा हसमुख चेहरा पहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर मोदींनी त्यांची पाठ थोपटल्याचा प्रसंगही पहायला मिळाले. त्यामुळे या सभेतील हा सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. (BKC Speech Eknath Shinde)
मी दावोसला भेट दिली. तेथे विविध देशातले लोक आले होते. मला अनेक लोक भेटले. काही पंतप्रधान होते काही मंत्री होते, ते फक्त आणि फक्त मोदींबद्दल विचारायचे. आम्हाला एक पंतप्रधान देखील भेटले आणि ते मला म्हणाले की, मी मोदींचा भक्त आहे. माझ्यासोबत त्यांनी फोटो घेतला आणि म्हणाले मोदींना हा फोटो दाखवा. जर्मनी, सौदीचे लोक भेटले ते देखील म्हणाले की, तुम्ही मोदीजींसोबत आहात ना? मी म्हणालो आम्ही त्यांचेच लोक आहोत. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मोदींचा करिष्मा जगभरात पसरला असल्याचं मत व्यक्त केले.
हेही वाचा