Latest

Balasahebanchi ShivSena : माेठी बातमी! ‘बाळासाहेबांची शिवसेना’ला मिळाले ढाल-तलवार चिन्ह

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने ढाल- तलवार चिन्‍ह दिले आहे. मंगळवारी आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह जाहीर केले होते. तर शिंदे गटाला पुन्हा नवीन पर्याय सादर करण्यास सांगितले होते. (Balasahebanchi ShivSena ) यानुसार शिंदे गटाने चिन्हासाठी आयोगाला उगवता सूर्य, ढाल- तलवार आणि वडाचे झाड हे तीन पर्याय ईमेलद्वारे सादर केले होते. यानंतर निवडणूक आयोगाकडून यामधीलच ढाल- तलवार हे चिन्ह 'बाळासाहेबांची शिवसेना' या शिंदे गटाला जाहीर केले आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटांची लढाई निवडणूक आयोगात गेल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने या दोन्ही गटांना नवीन नाव आणि चिन्हांचे पर्याय देण्यासाठी सांगितले. आयोगाच्या सूचनेनुसार या दोन्ही गटांनी आपआपले पर्याय सादर केले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव देण्यात आले आहे.

Balasahebanchi ShivSena : चिन्हासाठी सादर केले हाेते तीन पर्याय

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्‍हाबाबत पुन्हा पर्याय देण्याची सूचना केली होती. यानुसार शिंदे गटाने उगवता सूर्य, ढाल- तलवार आणि वडाचे झाड हे पर्याय चिन्हासाठी सादर केले. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ' ढाल- तलवार' हे चिन्ह देण्यात आले आहे. दरम्यान, शिवसेना हे नाव आणि या पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह शनिवारी (दि. 8) अंधेरी पोटनिवडणुकी पुरते ठवल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यामुळे दोन्ही गटांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करता येणार नाही.

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षाची पर्यायी नावे आणि चिन्हे मागितली होती. यानंतर सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक चिन्ह आणि नावे आयोगाकडे पाठवली होती. अखेर काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आयोगाने मोठी घोषणा केली. यात मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला देण्यात आले. मात्र शिंदे गटाने पुन्हा नव्याने तीन पर्याय आयोगाला ईमेलद्वारे सादर केल्यानंतर यामधील 'ढाल- तलवार' हे चिन्ह देण्यात आले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT