Latest

Shimron Hetmyer : ‘बाप’ हाेण्‍याचा आनंद,’आयपीएल’पेक्षा भारी…वेस्‍ट इंडिजचा हेटमायर मायदेशी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॅायल्स टीमचा वेगवान गाेलंदाज शिमरॅान हेटमायर ( Shimron Hetmyer )  हा आयपीएलचा सीजन सुरु असतानाच मायदेशी परतला आहे. त्‍याची पत्नी गर्भवती असून, लवकरच तिची प्रसूती हाेणार आहे. जीवनातील या अविस्‍मरणीय क्षणी पत्‍नीला साेबत करण्‍यासाठी त्‍याने यंदाच्‍या आयपीएल सीझनवर पाणी साेडले आहे.

Shimron Hetmyer : हेटमायरची पत्‍नी प्रसिद्ध मॉडेल 

शिमरॉन हेटमायरची पत्नी निर्वाणी ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. याशिवाय ती बिझनेस वुमनही आहे. 2019 मध्ये निर्वाणीचे हेटमायरशी विवाह झाले.

हेटमायरची पत्नी  निर्वाणी ही वेस्ट इंडिजच्या सर्वात सुंदर महिलांपैकी एक मानली जाते. तिच्या सौंदर्याचे लोक वेडे आहेत. साेशल मीडियावरही ती नेहमी चर्चेत असते.

निर्वाणी वेस्ट इंडिजमधील बड्या उद्योगपतीची मुलगी आहे.

निर्वाणी गर्भवती असून लवकरच तिची प्रसूती हाेणार आहे. या काळात निर्वाणीला साथ देण्‍यासाठी  हेटमायर आयपीएल 2022 चा हंगाम अर्धवट साेडून नुकताच  मायदेशी परतला आहे.

IPL 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा शिमरॉन हेटमायर याने आतापर्यंत उत्कृष्ट खेळी केली आहे. हेटमायर अखेरच्‍या षटकांमध्ये धमाकेदार फलंदाजी करतो.  काही काळासाठी ताे मायदेशी परतला आहे. लवकरच आपण पुन्‍हा आयपीएल खेळणार असल्‍याचे त्‍याने म्‍हटलं आहे. राजस्‍थान राॅयल प्‍ले ऑफमध्‍ये पाेहचल्‍यास हेटमायर पुन्‍हा मैदानात उतरेल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त हाेत आहे.

हेही वाचा

पाहा व्‍हिडीओ :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT