Latest

Shilpa Shetty and Richard Gere : ‘किसिंग’ केसमधून अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टीची निर्दोष मुक्‍तता, अश्‍लीलतेचा प्रसार केल्‍याचा हाेता आरोप

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

'किसिंग' केसमधून अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टीची न्‍यायालयाने निर्दोष मुक्‍तता केली आहे. २००७ मध्‍ये जयपूरमधील एका कार्यकम्रात हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेर याने अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टीचे (Shilpa Shetty and Richard Gere) जबदस्‍तीने चुंबन घेण्‍याचा प्रयत्‍न केला होता. याप्रकरणी तिच्‍यावर अश्‍लीलतेचा प्रसार केल्‍याचा आरोप ठेवण्‍यात आला होता. याप्रकरणी तब्‍बल १५ वर्षांनंतर शिल्‍पा शेट्‍टीला दिलासा मिळाला आहे.

Shilpa Shetty and Richard Gere : तब्‍बल १५ वर्षांनंतर शिल्‍पाला मिळाली माफी

जयपूरमधील एका कार्यकम्रातील चुंबनप्रकरणी मुंबईतील न्‍यायालयाने १८ जानेवारी रोजीच शिल्‍पा शेट्‍टीची निर्दोष मुक्‍तता केली. याचा आदेश सोमवार २४ जानेवारी रोजी देण्‍यात आला. याप्रकरणी शिल्‍पाने झालेल्‍या घटनेची माहिती दिली होती, शिल्‍पावर ठेवण्‍यात आलेले सर्व आरोप निराधार असून तिला या प्रकरणातून निर्दोष मुक्‍त करण्‍यात येत आहे, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले.

नेमकं काय घडलं हाेते ?

हे संपूर्ण प्रकरण आहे २००७ या वर्षातील. जयपूरमध्‍ये एड्‍स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमासाठी हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेर आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी यांची विशेष उपस्‍थिती होती. यावेळी रिचर्ड गेर यांनी शिल्‍पा शेट्‍टीचे जबदरस्‍तीने चुंबन घेण्‍याचा प्रयत्‍न केला होता. या प्रकरणी रिचर्ड याच्‍यावर जोरदार टीका झाली होती. तर शिल्‍पा शेट्‍टीने मौन बाळगले होते.

एका सामजिक संस्‍थेने रिचर्ड गेर आणि शिल्‍पा शेट्‍टी याच्‍यवर अश्‍लितेचा प्रसार केल्‍याचा आरोप केला होता. एप्रिल २००७ मध्‍ये राजस्‍थानमधील न्‍यायालयाने शिल्‍पा शेट्‍टी आणि रिचर्ड गेर यांच्‍याविरोधात अटक वॉरंटही काढले होते. यानंतर सर्वोच्‍च न्‍यायालायने याप्रकरणी याचिका फेटाळली होती.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ :

SCROLL FOR NEXT