Gehraiyaan songe out : नव्या अभिनेत्यासोबत दीपिका पादुकोणचे लिपलॉक (video) - पुढारी

Gehraiyaan songe out : नव्या अभिनेत्यासोबत दीपिका पादुकोणचे लिपलॉक (video)

पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण,अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा येत्या ११ फेब्रवारीला ‘गहराईयां’ ( Gehraiyaan ) चित्रपट येत आहे. सध्या या चित्रपाटातील एक गाणे ( Gehraiyaan songe out ) सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. याआधी ‘गहराईयां’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता.

गहराईयां चित्रपटाचे शूटिंग संपले असून सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कलाकार बिझी आहेत. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी याच्या मुख्य भूमिका साकारल्या आहेत. याच दरम्यान चित्रपटातील एक धमाकेदार गाणे ( Gehraiyaan songe out ) सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. या गाण्याचे बोल ‘डूबे डूबे’ असे आहे. या गाण्यात दीपिका आणि सिद्धांतची केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला मिळाते.

या गाण्यात दोघेजण एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाल्याचे दाखवण्यात आले आहे. यातील खास म्हणजे, या गाण्यात दीपिका आणि सिद्धांतचा किसिंग सीन दाखवला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता ‘डूबे डूबे’ या गाण्याने चाहत्यांना भूरळ घातली आहे.

या गाण्याला अंकुर तिवारी, कबीर कथपालिया आणि सवेरा यांनी संगीत दिले आहे. कौसर मुनीर हे गीतकार आहेत.  यांनी लिहिले असून लोथिका झा यांनी गायिले आहे. दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत चित्रपटात अनन्या पांडे, धैर्य करवा अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर याच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

दीपिकाच्या ड्रेसवर सर्वाच्या नजरा

याच दरम्यान मुंबईतील ताज हॉटेलमध्ये या चित्रपटाचा प्रमोशनसाठी एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात दीपिका पादुकोण, शकुन बत्रा, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांनी  उपस्थिती लावली.

या कार्यक्रमात दीपिकाच्या ऑरेंज रंगाच्या कट आऊट मॅक्सी ड्रेसवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या. या ड्रेसमध्ये दीपिका ग्लॅमरस दिसली असून तिच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी अनन्या पांडेने ब्रालेट आणि ऑफ व्हाइट पँट ड्रेसमध्ये दिसली आहे.

हेही वाचलंत का? 

(viralbhayani instagram वरून साभार )

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button