Latest

Whats Love Got To Do With It : दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या चित्रपटाला तब्बल ९ नामांकने!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक शेखर कपूर यांचा सर्वात अलीकडील चित्रपट 'व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट' जगभरात प्रदर्शित झाला. यूके, यूएसए आणि भारतात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आणि जागतिक स्तरावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. ( Whats Love Got To Do With It) या आठवड्याच्या सुरुवातीला ब्रिटीश राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर करण्यात आली. शेखर कपूरच्या चित्रपटाला एक-दोन नव्हे तर तब्बल सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह ९ नामांकने मिळाली. ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे. (Whats Love Got To Do With It)

शेखर कपूर त्यांच्या १९८३ मध्ये आलेल्या 'मासूम' या पहिल्याच चित्रपटाच्या सिक्वेलवर काम करत आहे आणि त्याचे नाव 'मासूम… द न्यू जनरेशन' असे असणार आहे.

यांच्या एलिझाबेथ आणि एलिझाबेथ: द गोल्डन एज ​​या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही चित्रपटाचा बोलबाला आहे. त्यांनी केट ब्लँचेट, एडी रेडमायन आणि हेथ लेजर यांसारख्या अभिनेत्यांसह काम केले होते. अनोख्या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी शेखर कपूर ओळखले जातात.

SCROLL FOR NEXT