Latest

शंभर रुपये दंड भरण्यासाठी त्यांनी केला बारामती ते पुणे प्रवास

अमृता चौगुले

 जळोची : पुढारी वृत्तसेवा : दुचाकी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्यामुळे रोहिणी शिवराम सोनवणे यांना वाहतूक पोलिसांनी 200 रुपये ऑनलाइन दंड केला होता. बारामतीहून पुण्यात येत लोकअदालतीत त्यांना सवलत मिळून त्यांनी 100 रुपये दंड भरला. याबद्दल विशेष बाब म्हणून 'जागरुक नागरिक' पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. पुणे पोलिस उपायुक्त कार्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने 'न्याय आपल्या दारीचे' आयोजन केले होते. त्यात वाहतूक नियमन उल्लंघन प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. याप्रसंगी रोहिणी सोनवणे यांना जागरूक नागरिक पुरस्कार देण्यात आला.

संबंधित बातम्या : 

जिल्हा सत्र न्यायाधीश श्याम चांडक, पोलिस आयुक्त रितेश कुमार, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त विजयकुमार मगर आदी उपस्थित होते. बारामती शहरात दुचाकी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी सोनवणे यांना 200 रुपये दंड केला होता. सोनवणे यांच्या मोबाईलवर वाहतूक शाखेने दंड भरण्यासाठी लोकअदालतीत येण्यास सांगितले. बारामतीहून पुणे येथे एसटीने जाऊन सवलतीत 100 रुपये दंड त्यांनी भरला. याबद्दल त्यांना पुरस्कार दिल्याचे वाहतूक शाखेने सांगितले. वेळ व पैसा खर्च करून पुण्यात येऊन जागरुकता दाखवली हे सुजाण भारतीय नागरिकाचे लक्षण असल्याचे आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT