Latest

Jio Financial ची शेअर बाजारात एंट्री, पण लिस्टिंगनंतर लागले ५ टक्क्यांचे लोअर सर्किट

दीपक दि. भांदिगरे

Jio Financial Listing : रिलायन्समधून वेगळ्या झालेल्या जियो फायनान्सियल सर्व्हिसेसची (Jio Financial Services) आज शेअर बाजारात एंट्री झाली. जियो फायनान्सियल सर्व्हिसेसचा शेअर आज बाजारात लिस्ट झाला. या शेअरचे बीएसई निर्देशांकावर २६५ रुपयांवर लिस्टिंग झाले. तर एनएसईवर हा शेअर २६२ रुपयांवर लिस्ट झाला. रिलायन्समधून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे डिमर्जर झाले होते. त्यानंतर हा शेअर आज लिस्ट झाला.

दरम्यान, लिस्टिंगनंतर बीएसईवर या शेअरला ५ टक्क्यांचे लोअर सर्किट लागले. बीएसईवर हा शेअर ५ टक्क्यांनी खाली येऊन २५१ रुपयांवर आला. तर रिलायन्सचा शेअरही १ टक्क्यांच्या घसरणीसह २,५२६ रुपयांवर ट्रेड करत आहेत.

५ टक्के सर्किट मर्यादेमुळे या शेअर्समध्ये कोणताही मोठा चढ-उतार होण्याची शक्यता नाही, असे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे. एखाद्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड झाली अथवा बाजाराने उसळी घेतली तर लोअर किंवा अप्पर सर्किट लावले जाते.

दरम्यान, हा शेअर जरी लिस्टिंग झाला असला तरी पुढील १० ट्रेडिंग दिवसांत हा शेअर इंट्रा-डे- ट्रेडिंग करणार नाही. तर १० ट्रेडिंग सत्रात हा शेअर ट्रेड- टू- ट्रेड सेगमेंटमध्ये (Trade-to-Trade segment) राहील.

ट्रेड- टू- ट्रेड सेगमेंट म्हणजे काय?

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, जर कोणताही शेअर ट्रेड- टू- ट्रेड सेगमेंटमध्ये व्यवहार करत असेल तर याचा अर्थ असा की या शेअरमध्ये केवळ डिलिव्हरी बेसिसवर व्यवहार होईल. जर तुम्ही हा शेअर सकाळी खरेदी करुन सायंकाळपर्यंत तुम्ही त्याची विक्री करणार असाल तर तुम्ही तसे करु शकणार नाही. याचाच अर्थ की या शेअरची एक दिवसातच खरेदी-विक्री होणार नाही. एका दिवसातील खरेदी-विक्रीला इंट्रा- डे ट्रेडिंग म्हटले जाते. पुढील १० ट्रेडिंग दिवसांपर्यंत जियो फायनान्सियल सर्व्हिसेस शेअर्सचे ट्रेडिंग केवळ डिलिव्हरी आधारावर होईल. या दरम्यान जियो फायनान्सियल सर्व्हिसेसचा शेअर्स खरेदी करुन त्याच दिवशी विकणार असणार तर ऑर्डर रिजेक्ट होईल.

जेएफएसएल ३३वी सर्वात मोठी कंपनी

जियो फायनान्सियल सर्व्हिसेसचे बाजार भांडवल सुमारे १.५९ लाख कोटी आहे. जेएफएसएल (JFSL) ही भारतातील ३३वी सर्वात मोठी सूचीबद्ध झालेली ही कंपनी आहे. ही कंपनी HDFC लाइफ इन्शुरन्स, एसबीआय लाईफ (SBI Life) आणि इंडसइंड बँक यांच्यापेक्षा मोठी आहे. नॉन बँकिंग फायनान्सियल कंपन्यांच्या (NBFC) यादीत बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह या मोठ्या कंपन्या आहेत. (Jio Financial Services)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT