Latest

Sharad Pawar : नितिश कुमार यांनी बोलावलेल्या बैठकीला शरद पवार जाणार का?

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sharad Pawar : भाजपचा 2024 च्या निवडणुकीत पराभव करायचा असेल तर विरोधकांनी एकजूट करायला हवी. विरोधकांनी एकत्रित यायला हवे, असे सर्वच विरोधी पक्षांचे मत आहे. यासाठी नितिशकुमार यांनी पुढाकार घेऊन देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. त्यासाठी पक्ष प्रमुखांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असा आग्रह नितिशकुमार यांनी धरला आहे. नितीश कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील यासाठीचे निमंत्रण दिले आहे.

नितीश कुमार यांनी बोलावलेल्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अखेर शरद पवार यांनी स्वतःच याबाबत खुलासा केला आहे. शरद पवार हे नितीश कुमार यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. एएनआयने याचे ट्विट केले आहे.

एएनआयच्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे, शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी २३ जून रोजी बैठक बोलावली आहे. त्यांनी मला बोलावून निमंत्रण दिले आहे. त्यांनी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. मी तिथे जाणार आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी निमंत्रण दिले आहे. राष्ट्रीय मुद्द्यावर एकत्र काम करण्याची गरज आहे…."

दरम्यान, शरद पवार यांच्या या स्पष्टीकरणामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नवी चर्चा सुरू झाली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT