Latest

मोठी बातमी! शरद पवारांच्या निवृत्तीवर अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार निवृत्तीची घोषणा करतील असे कुणाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हते. त्यांच्या या निर्णयानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव येत्या ते येत्या दोन ते तीन दिवसांत फेरविचार करतील. त्यांनी याबाबत स्वत: सहमती दर्शवली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली. यावेळी पक्षातील नेते खासदार सुप्रिया सुळे, धगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि. 2) झाले. यावेळी पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घोषित केला आहे. या घोषणेनंतर राज्यासह देशाच्या राजकारंणात भूकंप झाला. त्यांच्या या कृतीचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केल्याने पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात (sharad pawar books) उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला. अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. साहेब, निवृत्तीचा निर्णय मागे घ्या, अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली. यासाठी ते मोठ्या संख्येने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर ठाण मांडून बसले होते. सायंकाळी शरद पवारांनी पक्षातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार हे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव येत्या ते येत्या दोन ते तीन दिवसांत आपल्या निर्णयावर फेरविचार करतील, असे सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT