साखरवाडी; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माघारी घेत असल्याचे जाहीर केले होते. व पुन्हा जोमाने सार्वजनिक जीवनात सक्रिय होणार असल्याचे पत्रकार परिषद सांगितले होते. त्यानुसार आज (दि. ६) पवार यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधील वाठार निंबाळकर येथे डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची बांधावर जाऊन भेट घेतली. यावेळी डाळिंबावर आलेल्या तेल्या, मररोग व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.
पवार (Sharad Pawar) यांनी वाठार निंबाळकर येथील प्रगतशील शेतकरी व डाळिंब उत्पादक चंद्रकांत अहिरेकर यांच्या डाळिंब बागेस भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर, तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, शेतकरी, वाठार निंबाळकर ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व शेतकरी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या अनावरण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्यानंतर मागील तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्र सह संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते व राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या मागणीचा आदर करून त्यांनी आपण राजीनामा माघारी घेत असल्याचे जाहीर केले. व पुन्हा जोमाने सार्वजनिक जीवनात सक्रिय होणार असल्याचे पत्रकार परिषद सांगितले होते. त्यानुसार पवार यांनी आपल्या नियोजित दौऱ्याला सुरूवात केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या अनावरण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्यानंतर मागील तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते व राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या मागणीचा आदर करून त्यांनी आपण राजीनामा माघारी घेत असल्याचे जाहीर केले.
हेही वाचा