Latest

आश्वासक चेहरा ‘शरद पवार’च; सुप्रिया सुळेंनी शेअर केला व्हिडिओ

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या शपथविधीला पक्षाची मान्यता नाही. गेलेल्या आमदारांशी आमचा संपर्क सुरु आहे, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही शरद पवार यांचा व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार यांना पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोणता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पवार यांनी 'शरद पवार' असे उत्तर दिले होते. या पत्रकार परिषदेचा शॉर्ट व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

गेलेल्या आमदारांशी चर्चा सुरू, सर्व महाराष्ट्र शरद पवार यांच्या पाठीशी : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार काम करत होते. आज (दि.२) सकाळी त्यांनी राजभवनात जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या काही सदस्यांनी मंत्रीमंडळात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची याला कोणतीही मान्यता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकसंध पणाने शरद पवार याच्यासोबत आहेत. राजभवनातून टीव्हीवर दिसणाऱ्या सर्वांनी शरद पवार यांच्याकडे आम्ही गोंधळलेलो होतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले आहे. गेलेल्या आमदारांशी आमची चर्चा सुरु आहे, असे राष्ट्र्वादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT