Latest

Shane Warne Death : शेन वॉर्न याने दोन महिलांकडून घेतला मसाज

अमृता चौगुले

बँकॉक; पुढारी ऑनलाईन डेस्क : थायलंड पोलिसांनी सोमवारी सांगितले की, क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या ( Shane Warne Death )  पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे. मात्र मृत्यूच्या काही तासांपूर्वीचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यातून अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. डेलीमेलच्या वृत्तानुसार, शेन वॉर्नने चार मसाज करणाऱ्या महिलांना बोलावले होते. हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी तो त्यांच्या संपर्कात होता.

सीसीटीव्ही फुटेजमधून उघड होणार रहस्य! ( Shane Warne Death )

शुक्रवारी दुपारी 1:53 वाजता, चार महिला आल्या, त्यापैकी दोन शेन वॉर्नच्या खोलीत आणि इतर दोन त्याच्या मित्रांकडे जातात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यानुसार सर्वजण दुपारी २.५८ वाजता रिसॉर्टमधून बाहेर पडतात. दोन तास 17 मिनिटांनंतर म्हणजेच संध्याकाळी 5:15 वाजता शेन वॉर्न पहिल्यांदा बेशुद्ध अवस्थेत दिसला, त्यानंतर तो उठू शकला नाही.

खून किंवा नैसर्गिक मृत्यू ( Shane Warne Death )

पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांचा अहवाल वॉर्नच्या कुटुंबीयांना आणि ऑस्ट्रेलियन दूतावासाला पाठवण्यात आला आहे, असे राष्ट्रीय पोलिस उपप्रवक्ता किसाना पठानाचारोन यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना शंका नाही, असे त्यात म्हटले आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त जनरल सुरचेत हकपर्न म्हणाले, "झ्रटापटीची कोणत्याही खुना नाहीत किंवा वस्तू हरवल्याची तक्रान नाही. त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे रुग्णालयाच्या संचालकांनी म्हटले आहे.

आहारावर व्यवस्थापकाचा खुलासा ( Shane Warne Death )

शेन वॉर्नचे व्यवस्थापक जेम्स एरस्काइन यांनी खुलासा केला आहे की महान ऑस्ट्रेलियन फिरकीपटू सुट्टीवर जाण्यापूर्वी दोन आठवडे द्रव आहार घेत होता आणि त्याला छातीत दुखत होते आणि घाम येत होता. एर्स्काइन म्हणाले, 'अलिकडे तो विचित्र आहार घेत होता. अलीकडे, तो 14 दिवस फक्त द्रवपदार्थ घेत होता. यामध्ये तो फक्त काळा आणि हिरवा ज्यूस घेत होता. त्याने आयुष्यभर सिगारेट ओढली. मला वाटतं हृदयविकाराचा झटका आला असावा.

पालकांचे विधान ( Shane Warne Death )

वॉर्नच्या कुटुंबीयांनी सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्याचा मृत्यू ही कुटुंबासाठी कधीही न संपणाऱ्या दुःस्वप्नाची सुरुवात होती. त्याचे वडील कीथ आणि आई ब्रिजिटने लिहिले आहे, 'शेनशिवाय भविष्याची कल्पना करू शकत नाही. त्याच्यासोबतच्या असंख्य आनंदी आठवणी आपल्याला या दुःखावर मात करण्यास मदत करतील. त्या म्हणाल्या, 'शेनला व्हिक्टोरियन आणि ऑस्ट्रेलियन असण्याचा किती अभिमान होता हे सगळ्यांना माहीत आहे.'

MCG येथे अंत्यसंस्कार

दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नवर(MCG) येथे शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातील, ज्यामध्ये सुमारे एक लाख लोक जमतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर जाहीर शोकसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. एमसीजी हे वॉर्नचे आवडते मैदान होते. याच मैदानावर १९९४ मध्ये इंग्लंडविरुद्ध बॉक्सिंग-डे कसोटीत त्याने हॅट्ट्रिक केली होती. एमसीजी मैदानाबाहेर वॉर्नचा पुतळा बसवण्यात आला असून त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांनी येथे गर्दी केली आहे. एमसीजीच्या सदर्न स्टँडला एसके वॉर्न स्टँड असे नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT