Latest

शाहू महाराजांनी संभ्रम दूर केला : संजय राऊत

अमृता चौगुले

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : छत्रपती शाहू महाराजांनी सत्य बोलून संभाजीराजे यांच्यावरुन जो संभ्रम निर्माण झाला होता तो दूर केला. शाहू विचार आणि कोल्हापूरातील पुरोगामी विचारांनी शाहू महाराजांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांची कोंडी केली, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर येथे केले.

संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी शिवसेनेच्या सभेत शाहू महाराजांचे आभार मानत त्यांनी सर्व संभ्रम दूर केले असे म्हणत शाहू महाराजांच्या गौप्यस्पोटामुळे फडणवीस आणि भाजपची कोंडी झाल्याचे यावेळी राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजे यांच्या विरुद्ध कटकारस्थान रचले आणि त्यांचा गैरवापर केला, असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

संभाजीराजे यांना पुढे करुन भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी एक डाव रचला होता, एक कपट रचले गेले होते. शाहू महारांजानी सत्य बोलून हे कपट उधळवून लावले आणि सत्य काय आहे ते जनतेसमोर आणले. छत्रपती घराणे आणि शिवसेना यांच्यात काही मतभेद नाहीत हे शाहू महाराजांच्या वक्तव्यामुळे सिद्ध झाले असल्याचे यावेळी संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेत सन्मानाने या

यावेळी संजय राऊत म्हणाले, आम्ही संभाजीराजे यांना शिवसेनाही शिवाजी महाराजांची आहे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. येथे तुम्ही सन्मानाने या असं सांगितलं. पण त्यांनी ते केले नाही. शिवसेना सामान्य शिवसैनिकांना अलगद उचलते. आता कोल्हापूरातून संजय पवार यांना संधी दिली आहे. त्यांनी आता दिल्लीची तयारी करावी. तेथे हिंदी बोलावी लागते त्याची तयारी करा, मला माहित आहे कोल्हापूरची हिंदी कशी असते असे म्हणत त्यांनी सभेत हास्य निर्माण केले.

चर्चा टोपी, लाऊड स्पिकर आणि अजानाची

संजय राऊत म्हणाले, २०१४ च्या आधी भ्रष्टाचार, विकास, बेरोजगारी यावर चर्चा होत होती. २०१४ नंतर टोपी, लाऊड स्पिकर, अजान याच्यावर चर्चा होत आहे. लोकांच्या प्रश्नावर चर्चा होत नाही. लोकांचे प्रश्न रोजगाराचा आहे, महागाईचा प्रश्न आहे त्याच्यावर बोलणार नाहीत. बोलताता कशावर तर ताजमहालच्या खाली मंदीर आहे. असेल मंदीर पण तुम्ही दोन कोटी रोजगार देणार होता त्याच काय? महागाईचं विचारलं तर ज्ञानवापीच्या मशिदीत मंदीर होतं. असे मुद्दे काढून हे लोकांना मुलभूत प्रश्नांपासून बाजूल घेऊन जाण्याचे काम करत असल्याची टीका संजय राऊत यांनी भाजप आणि मोदी सरकारवर केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT