Latest

Shahrukh Khan : शाहरुख खान लालबागचा राजाच्या दर्शनाला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : किंग खान शाहरुखने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. (Shahrukh Khan) यावेळी त्याच्यासोबत त्याचा लहान मुलगा अबराम खान होता.

शाहरुखने व्हाईट कुर्ता परिधान केला होता. डोळ्यांवर गॉगल आणि केस बांधलेल्या लूकमध्ये शाहरुखने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी चाहत्यांची प्रचंड गर्दी मंडपात पाहायला मिळाली. (Shahrukh Khan)

दरम्यान, जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींची कमाई केली असून वर्ल्डवाईड ९०० कोटींचा आकडा पार केला आहे. पठान चित्रपटानंतर जवान चित्रपटाचे अभूतपूर्व यश आहे. अजूनही जवानची कमाईबाबतीत घोडदौड सुरुच आहे.

SCROLL FOR NEXT