Latest

Shahrukh Khan : मध्यरात्र होताच फॅन्स पोहोचले शाहरुखच्या बंगल्यावर (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : किंग खान शाहरुखला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. देश-विदेशातही त्याचे फ्रचंड संख्येने फॅन्स आहेत. शाहरुख केवळ बॉलीवूडच नाही तर जगाच्या हृदयावर राज्य करतो. आज किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा (Shahrukh Khan) वाढदिवस आहे. शाहरुख ५७ वर्षांचा झाला असून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या मन्नत या बंगल्यासमोर प्रचंड गर्दी झाली. फॅन्स त्याला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री त्याच्या बंगल्यासमोर जमले होते. आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोक त्याच्या घराबाहेर पोहोचले. (Shahrukh Khan)

शाहरुख मध्यरात्री मन्नतच्या टेरेसवरही आला होता, त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शाहरुख खानने आज जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. वयाच्या ५७ व्या वर्षीही शाहरुखची क्रेझ कमी झालेली नाही आणि कदाचित यामुळेच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मन्नतच्या बाहेर हजारो गर्दी जमली होती. प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होता. काही जण शाहरुख-शाहरुख ओरडत होते. तर काही लव्ह यू म्हणत होते. अनेकजण त्यांच्या नावाचे बॅनर घेऊन उभेही होते. शाहरुखनेही कोणालाही निराश केले नाही. त्याने बाल्कनीत येऊन हात उंचावून सर्वांना नमस्कार केला.

यादरम्यान अबरामही वडिलांसोबत दिसला. शाहरुख चाहत्यांना किस देताना आणि हात जोडून आभार मानताना दिसला. शाहरुख खानचा लूकही पाहण्यासारखा होता. गडद निळ्या रंगाच्या टी-शर्टसह त्याच रंगाच्या जीन्समध्ये तो देखणा दिसत होता. त्याचवेळी अबरामही पांढऱ्या टी-शर्टमध्ये खूपच क्यूट दिसत होता.

(video- instantbollywood insta वरून साभार)

SCROLL FOR NEXT