Latest

शाहरुख खानच्या ‘जवान’ने ३ दिवसात केला ‘हा’ टप्पा पार!

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांची केमिस्ट्री तसेच ॲटली याच्या दिग्दर्शनाने जवान चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. हा चित्रपट कमाईचे रेकॉर्ड मोडत आहेत. आता पर्यंत जवळपास २०० कोटींहून अधिक कमाई अवघ्या ३ दिवसांतच केली आहे, जी एक नविन विक्रम बनवत आहे.

याबाबत मिळालेल्‍या प्राथमिक माहितीनुसार, जवान बुलेट ट्रेनप्रमाणे जोरदार धावत आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 74.5 कोटींची कमाई केली असून, जवानचे कलेक्शन 202.73 कोटी झाले आहे. तर हिंदी 177.73 कोटी , तमिळ 14.37 कोटी आणि तेलुगू 10.63 कोटी कमाई झाली आहे.

शाहरुख खानचा वर्षातील दुसरा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे. जवान हा कमाईच्या बाबतीत आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरेल.

-हेही वाचलं का  

SCROLL FOR NEXT