Latest

मोहाली आरपीजी हल्ल्याची SFJ संघटनेने घेतली जबाबदारी; २० संशयितांना अटक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील मोहाली येथील पोलिसांच्या गुप्तहेर विभागाजवळ झालेल्या हल्ल्याविषयी मोठी बातमी हाती आलेली आहे. या हल्ल्याची जबाबदारी शिख फाॅर जस्टिस (SFJ) या संटननेने घेतली आहे. या संघटनेवर बंदी घातलेली आहे. सोमवारी पंजाब पोलीस कार्यालयावर राॅकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (आरपीजी) हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये इमारतीचे नुकसान झालेले होते.

त्यानंतर मंगळवारी रात्री या घटनेसंदर्भात तपास सुरू असताना या हल्लाचे धागेदोरे पाकिस्तानशी जोडलेले दिसून आले होते. एक इंग्रजी वृत्तपत्रानुसार एका अत्यापित व्हाॅईस मॅसेजद्वारे एका संघटनेने जबाबदारी घेतलेली आहे. पोलिसांनी सांगितले की, "शिख फाॅर जस्टिस संघटनेचे गुरपतवंत सिंहने या हल्ल्याची जबाबदारी घेतो, असा संदेश व्हाईस मॅसेजद्वारे केलेला आहे. त्याची सत्यता तपासण्यात आली असून हा मॅसेज खरा आहे."

मोहालीचे एसएसपी विवेक शील सोनी म्हणाले, "या घटनेची तपासणी जवळपास पूर्ण झालेली आहे. या तपासणीमध्ये १८-२० संशयितांना अटक करण्यात आली आहे." आरपीजी हल्ला होण्यापूर्वी मोहालीत हाय अलर्ट लागू करण्यात आला होता. सध्या तपास अधिकारी पुरावे गोळा करत आहे. त्यांनी मुख्यालयातून ३ मोबाईल टाॅवरमधून ६ ते ७ हजार मोबाईलचा डाटा डंपची तपासणी करत आहेत. हा हल्ला करताना चारचाकी उपयोग करण्यात आला असल्याची माहितीदेखील सीसीटीव्ही फुटेजवरून घेण्यात आली आहे.

मोहालीचे एसपी रविंद्र पाल सिंह म्हणाले की, "पंजाब पोलीस गुप्तहेर विभागावर हल्ला दशहतवाद्यांचा उद्देश होता. पोलिसांकडून अज्ञान व्यक्तींच्या विरोधात भारतीय दंडसंहितेनुसार ३०७, UAPA सहीत १६ कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

पहा व्हिडीओ : नवनीत राणांची सिनेमात अधिक प्रगती होईल" – डॉ. नीलम गोऱ्हे

SCROLL FOR NEXT