Latest

Rave Party : सेक्स, डान्स अन् ड्रग्ज म्हणजेच रेव्ह पार्टी !!!

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील रेव्ह पार्टीवर (Rave Party) एनसीबीने छापा टाकला. बाॅलिवूडचा किंग समजल्या जाणाऱ्या शाहरुख खानच्या मुलासहीत म्हणजेच आर्यन खानसहीत अन्य आठ जणांना अटक केली. त्यानंतर रेव्ह पार्टीची चर्चा जोरात सुरू झाली. पण, ही रेव्ह पार्टी म्हणजे काय? या पार्टीत अंमली पदार्थांचा वापर कसा होतो? हे आपण पाहू…

दारू, अंमली पदार्थांचं सेवन, म्युझिक, नाचगाणं, सेक्स या सगळ्यांचं मिश्रण रेव्ह पार्टीत असतं. अशा पार्टींचं नियोजन अगदी गुप्तपणे केलं जातं. ज्या बड्या लोकांना यामध्ये आमंत्रण दिलं जातं, ते लोक बाहेरील लोकांना माहीत होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतात.

अंमली पदार्थांच्या विक्री करणाऱ्यांसाठी रेव्ह पार्टींचं आयोजन ही एक मोठी संधी असते. कारण, रेव्ह पार्टीच एक अंमली पदार्थांची विक्री करण्याची सुरक्षित जागा आहे. मुंबई, पुणे, खंडाळा, पुष्कर आणि दिल्ली या रेव्ह पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

ही पार्टी (Rave Party) सामान्य लोकांना परवडणारी नसते, त्यामुळे अशा पार्टीमध्ये लोकांना अजिबात संधी नसते. या पार्टीमध्ये धनदांडगे आणि त्यांची मुलं दिसतात. या पार्टीमध्ये या बड्या लोकांकडून बेकायदेशीरपणे ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

प्रसिद्ध अभिनेते, त्यांची मुलं, माॅडेल, श्रीमंत लोकांची तरुण मुलं या पार्टीमध्ये सर्रास दिसतात. अंमली पदार्थांचं सेवन केल्यानंतर हे लोक सलग ८-८ तास डान्स करतात. या पार्ट्यांमध्ये २० हजार, ३० हजार आणि ६० हजार वॅटचा म्युझिक वाजवलं जातं.

एकीकडे अंमली पदार्थांचं सेवन आणि दुसरीकडे कानठाळ्या बसवणारं संगीत यामुळे कायद्याचं आणि समाज नियमांचं भान या पार्टीमध्ये राहत नाही. बेधूंद झालेली तरुण-तरुणी सेक्सकडे वळते. विशेष हे की, सेक्स करण्याची व्यवस्थाही इथं केलेली असते.

पहा व्हिडीओ : एक थी बेगम च्या दिग्दर्शकाशी खास गप्पा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT