Latest

Bengaluru Rains : बंगळुर शहरात पावसाचे थैमान; पाणी तुंबल्यामुळे लोकांची गैरसोय

अमृता चौगुले

बंगळूर; वृत्तसंस्था : बंगळूरमध्ये (Bengaluru Rains) गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसद़ृश
परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील अनेक भागांत इतके पाणी तुंबले आहे की, लोकांना सुरक्षित बाहेर
काढण्यासाठी बोटींची मदत घेतली जात आहे. येथील वरथूर उपनगरात बोटी तैनात करण्यात आल्या
आहेत.

बंगळूर : शहराला सोमवारी पावसाने झोडपले. पावसाच्या पाण्यातून वाट काढणारे नागरिक.
बंगळूर : शहराला सोमवारी पावसाने झोडपले. पावसाच्या पाण्यातून वाट काढणारे नागरिक.

सर्वाधिक प्रभावित क्षेत्रांमध्ये बेलंदूर, सर्जापुरा रोड, व्हाईटफिल्ड, आऊटर रिंग रोड आणि बीईएमएल
लेआऊट यांचा समावेश आहे. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी शहरात जोरदार पाऊस झाला होता. तेव्हाही
परिस्थिती अशीच होती. (Bengaluru Rains)

स्पाइस गार्डन परिसरात दुचाकी पाण्यात तरंगताना दिसल्या. स्पाइस गार्डन ते व्हाईटफिल्डपर्यंत पाणी
साचल्याने रस्ता बंद करावा लागला. यंदा प्रथमच उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या भागांत पाणी तुंबले आहे.
तेथील अनेक रहिवाशांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे (Bengaluru Rains)

SCROLL FOR NEXT