Latest

पुणे : सतरा वर्षीय मुलाचा डोक्यात गोळ्या झाडून खून  

निलेश पोतदार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका सतरा वर्षीय मुलाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. दशंत अनिल परदेशी (१७ रा. नाळ गल्ली, तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटने फाटा रस्त्यावरील कंपनीजवळ एक मुलगा रक्तभांबाळ अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता दशंतच्या डोक्यात एक गोळी झाडल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दशंतचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दशंत हा अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT