पुढारी ऑनलाइन डेस्क : येत्या 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. या निमित्त महाराष्ट्रात सरकारकडून सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, जनतेची अनेक कामे त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे जनतेची अनेकवेळा मोठी गैरसोय होते. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी त्यांची दाखल्याची किंवा अन्य कामे मार्गी लावण्यासाठी सरकारने सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे, असे फडणवीस म्हणाले. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस हा 17 सप्टेंबरला आहे. त्यामुळे 17 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत हा सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
तसेच यावेळी फडणवीस यांनी पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, आपत्ती प्रवण क्षेत्र चिंन्हांकित केली जाणार आदी मुद्द्यांची माहिती दिली.