Latest

Senthil Balaji : तमिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांचे प्रकरण मोठ्या पीठाकडे

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: आर्थिक घोटाळा प्रकरणी तमिळनाडूचे वीज मंत्री व्ही. सेंथिल बालाजी हे न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान तमिळनाडूच्या राज्यपालांनी बालाजी यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्याची घटना समोर आली होती. यासंदर्भात त्यांच्या पत्नीने हेबियस कॉर्पस याचिका मद्रास न्यायालयात दाखल केली होती. त्याच्या पत्नीच्या याचिकेची दखल घेत मद्रास न्यायालयाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे (Senthil Balaji ) सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.

तमिळनाडू मंत्रीमंडळातील मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी फौजदारी कारवाई सुरु आहे. यामध्ये नोकरीच्या बदल्यात पैसे घेणे आणि मनी लाँड्रिंगचे आरोप त्यांच्यावर आहेत. आज (दि. २९) तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी बालाजी यांना आज मंत्रीमंडळातून बडतर्फ (Senthil Balaji) केल्याचे जाहीर केले आहे. राज्यपालांनी घेतलेल्या या निर्णयानंतर सीएम स्टॅलिन संतापले होते.

बुधवारी (दि. २८ जून) चेन्नई सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. अली यांनी मंत्री सेंथिल बालाजी यांच्या न्यायालयीन कोठडीत १२ जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता सेंथिल बालाजी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान त्यांच्या पत्नीने केलेल्या याचिकेनुसार हे प्रकरण आता मोठ्या खंडपीठाकडे (Senthil Balaji) सोपविण्यात आले आहे, असे वृत्त एएनआयने म्हटले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT