Latest

Stock Market Update | सेन्सेक्स ६०० अंकांनी वाढला, कोणते शेअर्स तेजीत?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि ऑटो शेअर्समधील वाढीमुळे सोमवारी शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ६०० अंकांनी वाढून ७१,३०० पार झाला. तर निफ्टीने १९० अंकांनी वाढून २१,५४० चा टप्पा ओलांडला. (Stock Market Update)

सेन्सेक्सवर सन फार्मा, कोटक बँक, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, एलटी, ॲक्सिस बँक, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, टायटन हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. तर इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी हे शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे.

सोमवारी एचडीएफसी बँकचे शेअर्स वधारले. बँकिंग नियामकाने LIC ला देशातील सर्वात मौल्यवान बँकेमध्ये त्याची हिस्सेदारी वाढवण्याची परवानगी दिल्यानंतर HDFC बँकेचे शेअर्स जवळपास २ टक्क्यांनी वाढले. देशाच्या बँकिंग नियामकाने LIC ला HDFC बँकेत अतिरिक्त ४.८ टक्के हिस्सेदारी घेण्याची परवानगी दिली आहे.

एक्सचेंज डेटानुसार, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) भारतीय बाजारात विक्रीचा सपाटा सुरुच आहे. गेल्या गुरुवारी सुमारे २,१४४ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली होती.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT