Latest

Sensex Opening Bell : शेअर बाजाराची जोरदार घोडदौड कायम , निफ्टीने 20100 चा टप्पा ओलांडला, सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शेअर बाजाराने मंगळवारी ( दि. १२ ) सलग आठव्‍या दिवशी आपली जोरदार घोडदौड सुरु ठेवली आहे. प्रमुख बाजार निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला. निप्‍टीने प्रथमच 20110 च्‍या पुढे उघडला तर सेन्सेक्सनेही 300 अंकांची उसळी घेत 67539 वर झेप घेतली. बँक निफ्टी मागील बंदच्या तुलनेत 0.70% वाढून 45,893.80 वर उघडला. विस्तृत निर्देशांक हिरव्या रंगात उघडले आणि क्षेत्रीय निर्देशांक देखील सकारात्मक क्षेत्रात उघडले. ( Sensex Opening Bell )

तेजीच्या बाजारात, L&T चा हिस्सा सुमारे 3.5 टक्क्यांच्या वाढीसह अव्वल आहे. सोमवारी ( दि. ११) भारतीय बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाले होते. सोमवारी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी खरेदीमध्‍ये दाखवलेला उत्‍साहामुळे निफ्टी 19996 वर बंद झाला आणि सेन्सेक्स पहिल्यांदा 67,127 वर बंद झाला होता. निप्‍टीने या वर्षातील जुलैनंतरच्‍या दुसर्‍या प्रयत्‍नात २० हजारांचा टप्‍पा गाठण्‍यात यश मिळवले होते. ( Sensex Opening Bell )

जागतिक आर्थिक परिस्‍थितीमधील संमिश्र अवस्‍था आणि देशाबाहेरील प्रमुख भांडवली बाजारांचा कल बहुतांश नकारात्‍मक असताना देशांतर्गत गुंतवणूकदारांनी खरेदीमध्‍ये दाखवलेल्‍या उत्‍साहामुळे मंगळवारी बाजाराचे व्‍यवहार सुरु झाल्‍यानंतरही उच्‍चांकी व्‍यवहाराची घोडदौड सुरु राहिली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT