Latest

पुणे: आजोबा ‘झिंगाट’…५१ वर्षीय महिलेला प्रपोज करत दिला त्रास!

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा : तरुणाने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या अनेक घटना घटना शहरात घडतात. मात्र एका ज्‍येष्‍ठ व्‍यक्‍तीने शेजारी राहणार्‍या ५१ वर्षीय महिलेला प्रपोज केला.अश्लील गाणी म्हणून तिला त्रास दिला. हा प्रकार ऐकल्‍यानंतर पाेलिसांच्‍याही भुवया उंचावल्‍या. याप्रकरणी 60 वर्षीय व्‍यक्‍तीवर येरवडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा 60 वर्षाचा आहे. त्‍याला दारूचे व्यसन आहे. दि. 22 ऑगस्ट रोजी ताे आपल्‍या  घरासमोर आला. त्याने फिल्मी अंदाजात शेजारी राहणार्‍या 51 वर्षीय महिलेला "तु खूप सुंदर दिसते, मला वडतेस, आपण दोघे फिरायला जावू" म्हणत प्रपोज केले. तसेच महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईलअसे अश्लील हावभावही केले.

अश्‍लील गाणी लावून दिला त्रास

महिलेने त्याला तुम्ही तुमच्या घरात जाऊन झोपा, मला त्रास देवू नका असे सांगितले. यावरून त्‍याने अश्लील शिव्याही दिल्या. तसेच जोरदार आवाजात अश्लील गाणी म्हणून तिला त्रास दिला. या त्रासला कंटाळून महिलेने याप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. याप्रकरणी ६० वर्षीय व्‍यक्‍तीवर गुन्‍हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT