Latest

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन; रंगमंचावरच घेतला अखेरचा श्वास

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे रविवारी (दि.१२) निधन झाले. रंगमंचावर काम करत असतानाच त्यांनी स्टेजवरच अखेरचा श्वास घेतल्याची माहिती अभिनेते, दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

राजेश देशपांडे यांच्या 'सृजनोस्तव' हा रंगोत्सवाचा कार्यक्रम सुरू होता. 'सृजन द क्रिएशन' या त्यांच्या संस्थेचा चौथा वर्धापन दिन म्हणून काही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या रंगोत्सवात सतीश जोशी हेही महत्वपूर्ण भूमिकेत होते. कार्यक्रम सुरू असताना अचानक ते स्टेजवरून खाली कोसळले.

सतीश जोशी यांनी आजवर अनेक नाटके, मालिका, तसेच चित्रपटात केले आहेत. दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांच्या बहुतेक मालिकांमध्ये सतीश जोशी यांना भूमिका ठरलेल्या असायच्या. साहित्य संघाच्या 'मच्छकटिका' या नाटकातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. जोशी यांच्या निधनाने मराठी चित्रपट क्षेत्रात व नाट्यसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

"मी गेल्या दहा वर्षांपासून सतीश जोशी यांना ओळखतो, मला व माझ्या कुटुंबाला त्यांनी खूप मोठा आधार दिला होता", असे अभिनेते अतुल काळे भावुक होत म्हणाले. व त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT