Latest

Seema Haider | सीमा हैदर प्रकरण : सचिनला ‘लप्पू’, ‘झुरळ’ म्हणणाऱ्या शेजारणीवर कायदेशीर कारवाईचा इशारा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील सीमा हैदर आणि सचिनची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'पब्‍जी' प्रियकरासाठी चार मुलांसह पाकिस्तानमधून अवैधरित्‍या भारतात आलेली सीमा हैदर सध्‍या चर्चेचा विषय ठरली आहे. सध्‍या ती प्रियकर सचिन मीनासोबत नोएडा येथे राहत आहे. दरम्यान या प्रेमी युगलावर त्यांच्या शेजारणीने अपमानास्पद शब्द वापरत हल्लाबोल केला आहे. यानंतर सीमाच्या वकिलाने संबंधित महिलेवर मानहानीचा घटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या शेजारी राहणाऱ्या मिथिलेश भाटी यांनी या जोडप्यांवर शाब्दिक हल्लाबोल केला. शेजारणीने सचिनला 'लप्पू' तर सीमाला 'झिंगूर' (झुरळ) असे प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. यानंतर त्या शेजारीण अडचणीत येणार असल्याच्या चर्चा होत आहेत.

सीमा आणि सचिन यांच्यावर मिथिलेश भाटी यांनी अपमानास्पद केलेल्या टीकेची पोस्ट रातोरात सोशल मीडियावर व्हायरल झाली. या घटनेनंतर सीमा हैदरच्या वकिलाने तिची शेजारी मिथिलेश भाटी या महिलेला मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. यानंतर पुन्हा मिथिलेश भाटी यांनी सीमा हैदरला 'बंदरिया' म्हणत, स्वतःला पुन्हा अडचणीत आणले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT