Latest

Seema Haider ‘सीमा’ पार करून भारतात आलीच कशी? अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमा हैदर पाकिस्तानहून कशी आली? यावरून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. (Seema Haider) पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदर प्रकरणी कर्तव्यात हयगय केल्याने सशस्त्र सीमा बल (SSB) मधील सुरक्षा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एक इन्स्पेक्टर आणि एक हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. भारत-नेपाळ सीमेवर बसची तपासणी करताना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे. (Seema Haider) बसमधून सीमा हैदरने प्रवास केला होता.

सीमा हैदर ऑनलाईन गेम पबजीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचा रहिवासी सचिन मीनाच्या संपर्कात आली होती. ४ जुलै रोजी गौतमबुद्ध नगर पोलिसांनी अटक केल्यानंतर तिला एका स्थानिक कोर्टाने जामीन दिला होता. कोर्टाने निर्णय दिला होता की, ती आपल्या प्रियकरासाठी भारतात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असलेल्या केंद्रीय एजेन्सींनी एसएसबीला या गोष्टीचा तपास करायला लावला की, ती कराची ते नोएडा पोहोचण्यासाठी नेपाळ मार्गाने अखेर भारतात कशी पोहोचली?

त्यानंतर, एएसबीने २ ऑगस्टला एक आदेश जारी केला होता की, खुनवा चेकपोस्टवर तैनात असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलला दोषी ठरवलं होतं. आदेशात लिहिलं होतं की, "४३ बटालियन हेड कॉन्स्टेबल चंद्र कमल कलिताने बसमध्ये ३५ प्रवाशांचा तपास केला होता. त्यांनी खुलासा केला आहे की, सीट नंबर २८ मोकळी होती. सीट नंबर ३७, ३८, ३९ वर १४, १३ आणि ८ वर्षाची मुले प्रवास करत होती."

दरम्यान, सशस्त्र सीमा बल (एसएसबी) ने मोठी कारवाई करत एक निरीक्षक आणि एक हेड कॉन्स्टेबलला निलंबित केलं आहे. पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर ज्या बसमधून देशात आली आणि दिल्लीजवळील ग्रेटर नोएडा येथे पोहोचली त्या बसची तपासणी करताना कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप त्या दोघांवर ठेवण्यात आला आहे.

सशस्त्र सीमा बल (एसएसबी) च्या ४३ व्या बटालियनचे इन्स्पेक्टर सुजित कुमार वर्मा आणि हेड कॉन्स्टेबल चंद्र कमल कलिता हे १३ मे रोजी उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर या सीमावर्ती जिल्ह्यात प्रवासी वाहन नेपाळमधून सीमा ओलांडत असताना बस तपासण्यासाठी जबाबदार होते.

SCROLL FOR NEXT