Latest

Adani Group च्या चौकशीत नेमकं काय आढळलं?, सेबी देणार अर्थमंत्री सीतारामन यांना माहिती

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अदानी समूहाशी (Adani Group) संबंधित व्यवहारांची आता चौकशी केली जात आहे. अदानी एंटरप्रायझेसचा २० हजार कोटींचा एफपीओ (FPO) का मागे घेण्यात आला या चौकशीबाबत भांडवली बाजार नियामक 'सेबी' (SEBI) आता अर्थ मंत्रालयाला माहिती देणार आहे. SEBI बोर्ड १५ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेणार असून यावेळी चौकशीबाबत माहिती देणार असल्याचे समजते.

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर 'सेबी'ने अदानींच्या व्यवहारांवर देखरेख ठेवली आहे. याची माहिती SEBI बोर्ड अर्थमंत्र्यांना देईल, असे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. अमेरिकेतील शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूह स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड करत असल्याचा आरोप केला आहे. याचा मोठा फटका अदानी समूहाला बसला आहे. यामुळे अदानी समूहाने १०० अब्ज डॉलर गमावले आहेत.

सेबी अदानी समूहातील कंपन्यांच्या ऑफशोअर फंड तपासाबाबतची माहिती अर्थ मंत्रालयाला देणार आहे. भांडवली बाजार नियामक 'सेबी' अदानी समूहाच्या शेअर बाजारातील व्यवहाराची संपूर्ण तपासणी करत आहे. अदानी समूहाच्या व्यवहाराचे स्वरूप, मागे घेतलेल्या एफपीओमधील अनियमितता आणि समूहाच्या ऑफशोअर फंडांबाबत चौकशी करत आहे. अदानींच्या शेअर किमतीतील अस्थिरता नियंत्रणात राहावी यासाठी सेबीने अलीकडेच काही उपाययोजना केल्या होत्या. हिंडेनबर्ग रिपोर्टमधून केलेल्या आरोपानंतर अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी केली जात आहे.

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळत आहेत. याचा मोठा फटका अदानी समूहाला (Adani Group) बसला आहे. या पार्श्वभूमीवर अदानी एंटरप्रायझेसने त्यांचा २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ (फॉलोऑन पब्लिक ऑफर) मागे घेण्याचा निर्णय घेतला. ज्यांनी या एफपीओमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत करणार असल्याचे अदानी समूहाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, हा एफपीओ का मागे घेतला यावर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी खुलासा केला आहे. FPO मागे घेण्याच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटले असेल. पण बाजारातील अस्थिरता लक्षात घेता FPO पुढे कायम ठेवणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही असे कंपनीच्या बोर्डाचे मत असल्याचे गौतम अदानी यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT