Latest

मुंबई : विधान भवनच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक भिडले (व्हिडिओ)

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज धक्काबुकी झाली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक एकमेकांशी भिडले. ५० खोके एकदम ओके ही घोषणा एकदम जिव्हारी लागली आहे. सगळा घोटाळा बाहेर काढल्याने पोटशूळ उठले आहे. सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या आहेत. आम्हाला पाय लावलात तर सोडणार नाही, अशी धमकी आमदार भरत गोगावलेंनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विधान भवनाच्या पायऱ्यांवर धक्काबुकी झाली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक एकमेकांशी भिडले.

यावेळी भरत गोगावले म्हणाले, आमचा नाद करायचा नाही. आम्ही जशास तसं उत्तर दिलं. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ. त्यांनी घोषणा दिल्या आम्ही काय बोललो नाही. विधानभवनच्या पायऱ्यांवर यावेळी विरोधकांची जागा सत्ताधाऱ्यांनी घेतल्याने मोठा गोंधळ उडाला.

महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभतंय का? राजकीय सभ्यतेची ऐशीतैशी यावेळी पाहायला मिळाली. यावेळी अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाली. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT