Latest

‘ओआरओपी’चा तिढा लवकर सोडवा अन्यथा अवमानना नोटीस जारी करु : सर्वोच्च न्यायालय

नंदू लटके

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा –माजी सैनिकांना 'वन रॅंक, वन पेन्शन' नुसार त्यांची थकीत देणी लवकरात लवकर द्या, अन्यथा अवमानना नोटीस जारी करु, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने आज ( दि. २७) संरक्षण मंत्रालयाला दिला. 'ओआरओपी'ची देणी चार वेगवेगळ्या हप्त्यांत देण्याऐवजी एकाच हप्त्यात दिली जावीत, अशा विनंतीची याचिका माजी सैनिकांकडून दाखल केली आहे.

देणी देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे निर्देश दिले होते, त्याचे योग्यरित्या पालन केले जात नसल्याचा मुद्दा माजी सैनिकांकडून मांडण्यात आला होता. यावर कोर्टाने दिलेल्या आदेशांचे नीट करा, अशी टिप्पणी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सुनावणीदरम्यान केली.

'ओआरओपीच्या मुद्द्यावर याआधी 19 जानेवारी रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी देणी देण्यासाठी 15 मार्चपर्यंतचा वेळ दिला जावा, अशी विनंती केंद्र सरकारकडून न्यायालयाला करण्यात आली होती.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT