Latest

मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिस FIR नोंदवणार

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोप प्रकरणी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यास दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी सहमती दर्शवली. 'आम्ही एफआयआर नोंदवू. आम्ही आजच ही कारवाई करू', असे सॉलिसिटर जगरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान सांगितले.

विनेश फोगट आणि इतर सात कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. २१ एप्रिल रोजी ते एफआयआर नोंदवण्यासाठी कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात बराच वेळ बसून राहिले, पण पोलिसांनी एफआयआर नोंदवला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

२६ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की संशयितांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यापूर्वी आरोपांची प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यासह इतर कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाईसाठी गेल्या काही दिवसांपासून जंतरमंतरवर धरणे आंदोलन सुरु केले आहे. "आम्ही कोणत्याही पक्षाशी संलग्न नाही. यावेळी भाजप, काँग्रेस, आप किंवा अन्य कोणताही पक्ष असो, आमच्यात सहभागी होणाऱ्या सर्व पक्षांचे स्वागत आहे" असे बजरंग पुनिया याने म्हटले होते.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT