Latest

SBI च्या कर्जधारकांना झटका, ‘एमसीएलआर’ दरात वाढ

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्‍ट ऑफ फंड बेस्‍ड लेडिंग रेट (MCLR) दर वाढवले ​​आहेत. MCLR म्हणजे घेतलेल्या कर्जावरील किमान व्याज दर असतो. या निर्णयामुळे घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. आता EMI महाग होणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) च्या मार्जिनल कॉस्‍ट ऑफ फंड बेस्‍ड लेडिंग रेट (MCLR) ५ बेस पॉइंट्स (bps) म्हणजेच ०.०५ टक्के वाढ केली आहे. या वाढीमुळे सर्व मुदतीच्या कर्जांचा मासिक हप्ता (EMI) वाढणार आहे. मात्र ज्यांची कर्जे इतर बेंचमार्कशी जोडलेली आहेत त्या कर्जदारांना काही फरक पडणार नाही.

SBI च्या वेबसाइटवरील उपलब्ध माहितीनुसार, नवीन दर १५ जुलैपासून लागू झाले आहेत. या वाढीसह एका वर्षासाठी निधी-आधारित कर्ज दर (MCLR) ची सीमांत किंमत वाढवली आहे. पूर्वीच्या ८.५० टक्क्यांवरून वाढून ती ८.५५ टक्के झाली आहे. बहुतेक कर्जे एका वर्षाच्या MCLR दराशी जोडलेली असतात. एक महिना आणि तीन महिन्यांसाठी MCLR ०.०५ टक्क्यांनी वाढून अनुक्रमे ८ टक्के आणि ८.१५ टक्के झाला आहे. तर सहा महिन्यांचा MCLR ८.४५ टक्के असेल. त्याचबरोबर २ वर्षांचा MCLR देखील वाढला असून तो ८.६५ टक्के झाला आहे. तर ३ वर्षाचा MCLR ८.७५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

MCLR हा बँकेकडून ग्राहकांना दिलेला किमान दर असतो. जून २०२० मध्ये कोरोना काळात बँकेने MCLR दर कमी केला, त्यानंतर तो मार्च २०२२ पर्यंत तसाच ठेवला होता. १० जून २०२० आणि १४ एप्रिल २०२२ दरम्यान एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR ७.० टक्के होता. त्यामध्ये ८.५५ टक्क्यांपर्यंत अनेक वेळा वाढ झाली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT