Latest

Israel-Hamas War : ‘…या लढाईत कोणीच नायक नाही, सारे पीडितच’ : सौदी प्रिन्‍स

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्‍त्रालय -हमास युद्धाचा आज ( दि.22 ) सोळावा दिवस आहे. हजारो नागरिकांच्‍या बळी घेणार्‍या या रक्‍तरंजित संघर्षावर सौदी अरेबियाचे प्रिन्‍स ( Saudi Prince) फैसल यांनी हमास आणि इस्रायल या दोघांचा निषेध केला आहे. या संघर्षात कोणीच नायक नाही. सारे पीडितीच आहे, अशा शब्‍दांमध्‍ये त्‍यांनी आपला रोष व्‍यक्‍त केला आहे. तसेच यावेळी त्‍यांनी ब्रिटीश साम्राज्याविरोधातील भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्‍मरणही केले. ( Israel-Hamas War )

सौदी अरेबियाचे प्रिन्‍स फैसल यांचा अमेरिकन विद्यापीठात केलेल्या भाषणाचा व्‍हिडीओ व्‍हायरल झाला आहे. या भाषणात त्‍यांनी म्‍हटले आहे की, इस्रायलचे लष्करी सामर्थ्य श्रेष्ठ आहे. गाझामध्ये विध्वंस पाहू शकते, तसेच हमासकडून कोणत्याही वयोगटातील किंवा लिंगाच्या नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याचा मी निःसंदिग्धपणे निषेध करतो. अशा प्रकारचे लक्ष्य हमासचे इस्लामिक अस्मितेचे दावे खोटे ठरतात, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

इस्लाममध्ये निष्पाप मुले, महिला आणि वृद्धांची हत्या आणि प्रार्थनास्थळांची विटंबना करण्यास मनाई आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, इस्रायली शहरांवर हमासचे अचानक हल्ले आणि क्रूर प्रत्युत्तरामुळे आतापर्यंत 5,800 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. पॅलेस्टाईन समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी सौदी अरेबियाच्या प्रयत्नांना हाणून पाडल्याबद्दल सौदी राजकुमारांनी हमासचा निषेध केला.

Israel-Hamas War : दोन चुका एकत्र केल्याने बरोबर होत नाही…

इस्त्रायलने केलेल्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांबद्दल प्रिन्‍स फैसल यांनी इस्‍त्रायलवरही निशाणा साधला. दोन चुका एकत्र केल्याने बरोबर होत नाही. हा रक्तपात थांबलाच पाहिजे. तेल अवीववर पॅलेस्टिनींना लक्ष्य करून हत्या केल्याचा आणि नागरिकांना तुरुंगात टाकल्याचा आरोप करत ते म्हणाले, मी पॅलेस्टिनी भूमीत करण्‍यात आलेल्‍या घुसरखोरीचा निषेध करतो, असेही ते म्‍हणाले.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्‍मरण

यावेळी प्रिन्‍स फैसल यांनी ब्रिटीश साम्राज्याविरोधातील भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्‍मरण केले. ते म्‍हणाले, "पॅलेस्टाईनमधील लष्करी पर्यायाला माझा पाठिंबा नाही. मी पसंत केलेला दुसरा पर्याय म्हणजे नागरिकांचे बंड. याच मार्गाने भारतातील ब्रिटीश साम्राज्य आणि पूर्व युरोपमधील सोव्हिएत साम्राज्याचा पाडाव झाला आहे."

सौदी अरेबियाचे प्रिन्‍स फैसल यांनी २४ वर्षांहून अधिक काळ सौदीतील गुप्‍तचर संस्‍था अल मुखबरात अल अम्‍माहचे नेतृत्‍व केले आहे. तसेच इंग्‍लंड आणि अमेरिकेत राजदूत म्हणूनही काम केले. सध्या त्‍यांच्‍याकडे कोणतेही राजकीय पद नाही. तरीही त्‍यांनी केलेल्‍या विधानाला सौदी नेतृत्वाचा पाठिंबा असेल, असे मानले जात आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT