Latest

Satyapaal Malik : सत्यपाल मलिक यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर सीबीआयचे छापे

सोनाली जाधव

पुढारी वृत्तसेवा. नवी दिल्ली : जम्मू – काश्मिरमधील विमा घोटाळा प्रकरणी राज्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर सीबीआयने आज (दि.१७) छापे टाकले. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तसेच राजस्थानमध्ये नऊ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले असल्याची माहिती सीबीआय सूत्रांकडून देण्यात आली. (Satyapaal Malik )

Satyapaal Malik : तप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप 

ज्या लोकांच्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले आहेत, त्यात मलिक यांचे मीडीया सचिव सुनाक बाली यांचा समावेश आहे. विमा घोटाळा प्रकरणात बाली हा प्रमुख संशयित असून त्याच्याविरोधात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. दोन फाईली मंजूर करण्याच्या बदल्यात आरएसएसच्या एका नेत्याने आपणास तीनशे कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, असा सनसनाटी आरोप काही महिन्यांपूर्वी सत्यपाल मलिक यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप केले होते.

जम्मू – काश्मिरमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सामुहिक विमा योजनेत तसेच 2200 कोटी रुपये खर्चाच्या किरु हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा संशय आहे. त्यातून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. यासंदर्भात एप्रिल 2022 मध्येही सीबीआयने 14 ठिकाणी छापेमारी केली होती.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT